कोल्हापूर : कोल्हापूर मधील कागल तालुक्यातील मुरगुड या गावातून एक धक्कादायक घटना समोर येते आहे. मुरगुड मधील डॉक्टर असलेले महेश तेलवेकर वय वर्ष 40 यांनी आपल्याच दवाखान्यात आत्महत्या केल्याची घटना घडली या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात असलेल्या मुरगुडमध्ये हे डॉक्टर राहत होते. महेश यांनी आपल्याच दवाखान्यात आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक पत्र देखील लिहून ठेवले आहे. यामध्ये त्यांनी लिहिला आहे की, ” आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नका, मी चांगला मुलगा होऊ शकलो नाही. मी चांगला बाप होऊ शकलो नाही. मी कुटुंबीयांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. मी काही कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले आहेत. माझ्या आत्महत्येस कोणाला जबाबदार धरू नये. असं या पत्रामध्ये त्यांनी लिहिल आहे.
मुरगुडमधील बाजारपेठेमध्ये त्यांचे ओम नावाचे क्लिनिक आहे. रविवारी दुपारच्या सुमारास दवाखान्याच्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर नायलॉन दोरीने त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. दहा वर्षांपासून याच गावांमध्ये ते वैद्यकीय व्यवसाय करत होते.