शिवाजी महाराजांचा असा अपमान आपल्याला सहन करायचा असेल तर… ! आणि उदयनराजेंना झाले अश्रू अनावर

350 0

सातारा  : छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अपमान सहन करण्यापेक्षा मेलो असतो तर बरं झालं असतं, अशी आगतिकता खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. साताऱ्यात आज त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना या तीव्र भावना व्यक्त केल्या. राज्यात, देशात आज ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे.

V

रदेशातून लोक येतात तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचं नाव त्यांच्या कानावर पडतं. पण शिवाजी महाराजांचा असा अपमान आपल्याला सहन करायचा असेल तर मोठ्या-मोठ्या स्थळांना, ठिकाणांना त्यांचं नाव देण्याची गरज काय? हे बेगडी प्रेम कशासाठी? असा सवाल त्यांनी केला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ उदयनराजे भोसले यांनी याआधीही आक्रमक भूमिका घेतली होती. आज त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांचा निषेध केला. ते म्हणाले, त्याकाळात शिवाजी महाराजांनी समाजाचा विचार केला. आज सर्व व्यक्तिकेंद्रीत झाले आहेत. कोणीच अपवाद नाही. राष्ट्रीय पक्ष असो की प्रादेशिक पक्ष. असंच चालत राहीलं तर कितपत चालणार. या देशाचे तुकडे व्हायला किती वेळ लागणार?

Share This News
error: Content is protected !!