#PUNE : टिळक कुटुंबात उमेदवारी दिली तर निवडणूक बिनविरोध करणार का ? चंद्रकांत पाटलांचा नाना पटोलेंना सवाल

662 0

पुणे : भाजप कसबा पोटनिवडणुकीचे उमेदवार हेमंत रासने यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. दरम्यान पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रत्युत्तर देताना टिळकांच्या घरात उमेदवारी दिली तर निवडणूक बिनविरोध करणार का ? असा प्रतिसवाल केला आहे.

तसेच चिंचवड मतदार संघात उमेदवारी लक्ष्मण जगताप यांच्याच कुटुंबात दिली आहे. त्यामुळे चिंचवडमध्ये बिनविरोध निवडणूक होणार असं घोषित करून टाका असे देखील त्यांनी नाना पटोलेंना डिवचले आहे.

दरम्यान दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांच्याच कुटुंबीयांमध्ये उमेदवारी दिली जाईल, अशी आशा असताना टिळक कुटुंबाला डावलले गेल्यामुळे ब्राह्मण समाज नाराज झाल्याच्या कसबा मतदार संघात चर्चा सुरू आहेत. यावर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Share This News
error: Content is protected !!