समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा; अवघ्या 40 दिवसात 20 अपघात

843 0

समृद्धी महामार्ग : 520 किलोमीटर लांब समृद्धी महामार्गाच ११ डिसेंबर 2022 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. राज्य सरकारचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प असून गेल्या काही दिवसांपासून मात्र या महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत.

आज पहाटेच्या सुमारास देखील एका ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे . या अपघातामध्ये 20 प्रवासी जखमी झाले आहेत . हा अपघात बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नजीकच्या असोला फाटा गावाजवळ झाला असून, अपघात झालेल्या ट्रॅव्हल्स मधून बाहेर पडत असताना देखील मागून येणा-या एका भरधाव ट्रकने प्रवाशाला चिरडलं. या घटनेमध्ये या प्रवाशाचा जागीच मृत्यू देखील झाला.

अपघाताची ही पहिलीच घटना नाहीये, या महामार्गावरून अवघ्या 40 दिवसांमध्ये वीस अपघात झाले आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्गाला अपघातांचा महामार्ग अस देखील आता लोक म्हणू लागले आहेत. पण हे अपघात सातत्याने का होत आहेत ? तर या मार्गावरील वेग मर्यादा ही 120 किलोमीटर प्रतितास इतकी आहे. हा रस्ता चांगला देखील असला तरीही, अतिवेगच या अपघातांना कारण ठरत असल्याचं दिसून येत आहे. तर बऱ्याच वेळा रात्रीचा प्रवास देखील जीवावर बेतू शकतो. त्यामुळे या रस्त्यावरून जर तुम्ही प्रवास करणार असाल तर अतिवेग घातक ठरतो आहे. वाहनातील इंधन पुरेसे ठेवा तर बऱ्याच वेळा टायर फुटण्याचे देखील प्रकार घडले आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना काळजी घ्या.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!