#VIRAL VIDEO : मैत्री असावी तर अशी ! गाय विकली गेली होती, पण कुत्र्याने ती नेऊचं दिली नाही, हा व्हिडिओ पाहून डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही

1637 0

हा व्हिडिओ नक्की कुठला आहे हे समजू शकले नाही. पण या व्हिडिओतील लोक मराठी बोलत आहेत, त्यामुळे नक्कीच हा महाराष्ट्रातलाच असणार. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक कुत्र गाडी भोवती गोल फिरताय. या टेम्पोमध्ये एक गाय आहे ज्या गाईला त्याला बाहेर काढायच आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने ही गाय खरेदी केली आहे. पण या गाई सोबत नेहमी राहणारा तिचा हा मित्र आणि इमानदार कुत्रा ती गाय कुणीही घेऊन जाऊ नये यासाठी तडफड करतो आहे. घरापासून या टेम्पोचा दोन किलोमीटर पर्यंत पाठलाग या कुत्र्याने केला. त्यानंतर शेवटी त्या ग्राहकान टेम्पो थांबवला आणि हा व्हिडिओ शूट केला आहे.

मुक्या जनावराला देखील किती माया असते हे या व्हिडिओतून पाहायला मिळतंय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. आणि प्रत्येक जण गाय आणि कुत्र्याच्या मैत्रीवर आनंद व्यक्त करतायत.

अखेर या खरेदीदाराने टेम्पो पुन्हा माघारी वळवला आणि गाय देखील परत दिले आहे असे समजते.

Share This News
error: Content is protected !!