‘मराठी माथाडी कामगारांवर अन्याय जर होत असेल तर याद राखा..!’ निलेश माझिरे यांचा अधिकाऱ्यांना मनसे स्टाईल इशारा

456 0

पुणे : माथाडी कामगारांचे तीन वर्षापासून एका गोडाऊनने पेमेंट थांबवले आहे. माथाडी बोर्डाला वारंवार पत्रव्यवहार करून पण उत्तर मिळाले नाही. माथाडी कामगारांना पगार मिळत नाही. या प्रकरणी आज महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांनी माथाडी बोर्डाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना मनसे स्टाईलने इशारा दिला आहे.

माथाडी बोर्डाच्या अधिकाऱ्यांना माझा हा इशारा आहे. तुम्ही ज्या खुर्चीवर बसताना ते कामगारांना न्याय देण्यासाठी, कंपनीच्या मालकाशी सेटलमेंट करायला बसवलं नाहीये. एक जरी विषय माझ्या कानावर आला तर गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एवढे लक्षात ठेवा. आमच्या अंगावर 11 गुन्हे दाखल आहे. गुन्हे दाखल व्हायला आम्ही घाबरत नाही. जर मराठी माथाडी कामगारांच्यावर अन्याय होत असेल, तर याद राखा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बारीक लक्ष तुमच्याकडेकडे आहे. असा इशारा यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनाचे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांनी दिला आहे.

Share This News
error: Content is protected !!