“पक्ष देईल तो आदेश पाळणारा मी कार्यकर्ता, मी अपक्ष निवडणूक… !” वाचा सविस्तर

402 0

मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकी मधून भाजपने अखेर माघार घेतली. राज ठाकरे यांच्या पत्रानंतर शरद पवार यांनी देखील अंधेरी पूर्व पोट निवडणूक बिनविरोध व्हावी असे वक्तव्य केले. एकंदरीतच राजकीय परिस्थिती पाहता भाजपने अखेर आपली उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, “मी कधीच नाराज होत नाही. भारतीय जनता पक्ष हि आमची आई आहे. पक्षासाठी आम्ही मरत राहू, पण काम करत राहू. पक्ष नेतृत्वाच्या सोबत काम करत राहणार असून , मी अपक्ष निवडणूक लढवणार नाही. पक्ष जो आदेश देईल ते काम मी करेन आणि 25 वर्षे करत आलो आहे. असे मुरजी पटेल यांनी म्हटले आहे.

Share This News
error: Content is protected !!