दिशा सालियन प्रकरणावरून विधानसभेत प्रचंड गोंधळ ! सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना घेरले

330 0

नागपूर : दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळ अधिवेशनातही पाहायला मिळाले. भरत गोगावले आणि नितेश राणे यांनी विधानसभेत बोलताना हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर विधिमंडळात गोंधळ पाहायला मिळाला. दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची केस रिओपन करा. या प्रकरणाची पुन्हा एकदा कसून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी सभागृहात केली.

अधिक वाचा : कोण होती दिशा सालियन ? नेमकं काय घडलं ! CBI च्या अहवालानुसार

सभागृहातील गोंधळ पाहता विधानसभा अध्यक्षांनी सभागृह 10 मिनिटांसाठी तहकूब केलं.

पुन्हा सभागृह सुरू झालं. पण पुन्हा एकदा नितेश राणेंसह इतर नेत्यांनी दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. पुन्हा गोंधळ झाला अन् सभागृह पुन्हा एकदा 20 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं.

Share This News
error: Content is protected !!