BIG NEWS : शनिवार नव्हे ‘अग्निवार’ ! आधी नाशिक मग वणी नंतर मनमाड; वाहन उलटल्यानं सिलिंडर मिसाइलप्रमाणं उडाले हवेत VIDEO

520 0

मनमाड : नाशिकमध्ये आज पहाटेपासून सुरू झालेली अपघाताची मालिका थांबण्याचं काही नाव घेईना. आज पहाटे खासगी बसचा भीषण अपघात होऊन 11 जणांचा झालेला मृत्यू, त्यानंतर वणी येथे बसनं घेतलेला पेट आणि आता नाशिकच्या मनमाड-मालेगाव रस्त्यावर वाहनाला आग लागून त्यातील हायड्रोजन सिलिंडरचा झालेला स्फोट यामुळं आजचा शनिवार हा अग्निवार ठरलाय.

https://fb.watch/g1aylBvHac/

सुरुवातीला नाशिकच्या मनमाड-मालेगाव रस्त्यावर वाहन उलटून झालेल्या अपघातातील ही दृश्यं पाहा… ही दृश्यं पाहून कुणाच्याही काळजाचा थरकाप उडेल. या दृश्यात हवेत उडताना दिसणारी ही काही मिसाइल नाहीत बरं का ! हे आहेत स्फोट होऊन हवेत उडणारे हायड्रोजन सिलिंडर… नाशिकच्या मनमाड-मालेगाव रस्त्यावर मनमाडकडून मालेगावकडे 8 किलोमीटर अंतरावर कुंदलगाव शिवारात हायड्रोजन सिलेंडर घेऊन जाणारं वाहन उलटलं.

या वाहनात तब्बल 200 सिलिंडर होते. वाहनाला लागलेल्या आगीमुळं त्यातील हायड्रोजन सिलिंडरचे स्फोट होऊन ते अक्षरशः हवेत उडाले. नाशिक परिसरात आज घडलेले हे तीन अपघात पाहाता आजचा शनिवार हा अग्निवार ठरलाय.

Share This News
error: Content is protected !!