#PUNE ACCIDENT : बेल्हा-जेजुरी महामार्गावर भीषण अपघात; अपघातात माय लेकरासह एका तरुणाचा मृत्यू
शिक्रापूर : बेल्हा जेजुरी महामार्गावर दुचाकीवरून जात असताना माय लेकराचा आणि आणखीन एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिक्रापूरच्या दिशेने जात असताना एका टेम्पोने दिलेल्या जबर धडकेने या तिघांचाही अपघात स्थळावरच मृत्यू झाला.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, शिरूर येथील बेल्हा जेजुरी महामार्गावरून संकेत डोके (वय वर्षे 20) त्याची आई विजया डोके _वय वर्षे ४०) आणि संकेत चा एक मित्र ओंकार सुक्रे (वय वर्षे 20) हे तिघेजण शिक्रापूरच्या दिशेने जात असताना एका टेम्पोने त्यांना जबर धडक दिली.
ही धडक एवढी भीषण होती की, यामध्ये अपघात स्थळीच या तिघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी संपत डोके यांनी टेम्पो चालक अक्षय साकोरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
