भयानक : गर्भवती पत्नीपासून कोणत्याही परिस्थितीत व्हायचे होते विभक्त; पत्नीला दिले HIV बाधित रक्ताचे इंजेक्शन; आणि मग…

536 0

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील या भयावह घटनेने देश हादरला आहे. पत्नीपासून कोणत्याही परिस्थितीत विभक्त होण्याच्या उद्देशाने पतीने क्रूरतेचा कळस गाठला आहे. आरोपीची पत्नी ही गर्भवती असताना तिला क्लिनिकमध्ये तपासणीसाठी नेण्याच्या कारणाने तिला डॉक्टरांकडून एचआयव्ही बाधित रक्ताचे इंजेक्शन देण्यात आले. यामध्ये पतीने एका डॉक्टरला देखील त्याच्या कटामध्ये सामील करून घेतले होते.

डॉक्टरने या गर्भवती महिलेला वेदनाविरहित प्रसूती करून घेण्यासाठी इंजेक्शन देत असल्याचे सांगितले. डॉक्टर आणि आपल्या पतीवर विश्वास ठेवून तिने इंजेक्शन घेतले. याप्रकरणी या महिलेने पतीवर गंभीर आरोप देखील केले आहेत. मुलगा व्हावा आणि हुंड्यासाठी देखील पतीने मानसिक छळ केल्याची तक्रार या महिलेने दाखल केली असून, महिलेच्या वैद्यकीय तपासणीमध्ये तिचा अहवाल एचआयव्ही पॉझिटिव्ह आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!