भयानक : 31 डिसेंबरची रात्र त्या तरुणांसाठी ठरली काळरात्र ! दारुड्यांनी मागितलेले शंभर रुपये दिले नाहीत म्हणून तरुणाचा मनगटापासून तोडला हात, आणि मग …

607 0

पुणे : पुण्यातील हि घटना ऐकून अक्षरशः अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. अगदी एखाद्या चित्रपटांमध्ये साकारला जावा असा हा सीन आहे. पण हा चित्रपट नव्हता, या तरुणाचा हात अक्षरशः मनगटापासून कुऱ्हाडीने घाव घालून पूर्णपणे तोडण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये या तरुणाचा हात भरला आणि त्याच्यावर उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केलं. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, 31 डिसेंबरला पुण्यामध्ये नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी पंकज तांबोळी, साजिद शेख आणि अशितोष माने हे मित्र एका हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. 31 डिसेंबर आणि त्यात खानावळ बंद या निमित्ताने आज हॉटेलमध्ये त्यांनी जेवण केले आणि रात्री एकच्या सुमारास ते हॉटेलच्या बाहेर पडले.

यावेळी अचानक मोटर सायकलवरून दोन दारुडे तिथे आले. नशेच्याच अवस्थेत असताना ते जबरदस्तीने हॅपी न्यू इयर म्हणत होते. आणि त्यांनी पंकजकडे शंभर रुपयांची मागणी केली. पंकज ने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या आरोपींनी थेट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आणि आपल्या आणखी काही साथीदारांना देखील बोलावून घेतले.

हळूहळू हा वाद एवढा विकोपाला गेला की, यातील एका आरोपीने पंकजचा कुऱ्हाडीने जबरदस्त घाव घालून मनगटापासून हात तोडला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंकजचा पंजा एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून त्याच्यावर उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केलं. सध्या पंकज वर उपचार सुरू आहेत. या सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आल असून त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चतुशृंगी पोलीस पथक अधिक तपास करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!