पुणे : पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या अदर पूनावाला यांना कोट्यावधींचा गंडा घातलेल्या चार उच्चशिक्षित आरोपींना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. धक्कादायक म्हणजे या हाय प्रोफाईल सायबर क्राईम केसमध्ये आणखीनही काही राजकीय व्यक्तिमत्व आणि बांधकाम व्यवसायिक देखील अडकले असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
ही घटना आहे ७ सप्टेंबरची… सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला यांचा वैयक्तिक नंबर हॅक केला. या वैयक्तिक नंबर वरून काही कोट्यावधींची रक्कम एका ठराविक बँक अकाउंटवर ट्रान्सफर केली जावी असा मेसेज सिरम इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर सतीश देशपांडे यांना केला गेला. अर्थात अदर पुनावाला यांच्या वैयक्तिक नंबर वरून केला गेलेला हा मेसेज असल्यामुळे ही रक्कम देखील ट्रान्सफर केली गेली होती.
फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर तात्काळ लगेचच बंद गार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद करण्यात आली. आणि त्यानंतर पोलिसांनी अत्यंत गोपनीयता बाळगून शीताफिने या चार उच्चशिक्षित आरोपींना बिहारमधून ताब्यात घेतले. धक्कादायक म्हणजे अशा घटनांमधून काही बांधकाम व्यावसायिक आणि राजकीय व्यक्तिमत्व देखील गंडवले गेले असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
या ओरोपींकडून अधिक चौकशी केल्यानंतर आता अधिक धक्कादाय खुलासे देखील होऊ शकतात. एकंदरीतच या प्रकरणावरून या कोट्याधिशांना घातला जाणारा गंडा, व्हीआयपी असलेले नंबर देखील हॅक करून त्यावरून पैशांची केली जाणारी मागणी… हे खूप गंभीर प्रकरण आहे. हे चारही आरोपी उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे अगदी सामान्यांनी देखील यापुढे कोणतेही ऑनलाईन ट्रांजेक्शन करताना चौकसपणे करावे आणि सतर्क राहणे आवश्यक असल्याचे लक्षात येते.
दरम्यान, सिरम कंपनीचे मालकांचे नावे खोटे व्हाट्सअप मेसेज करुन सिरम कंपनीची १ कोटी रुपयांची फसवणुक करणारे वेगवेगळ्या राज्यांमधील ०७ सायबर गुन्हेगारांना बंडगार्डन पोलीसांनी केली अटक केली आहे.
दाखल झालेल्या गुन्हयाची पध्दत पाहता आरोपीनी स्वतःचे नावाचा कोठेही उल्लेख होऊ न देता एका नामांकित कंपनीची कोटयावधी रुपयांची फसवणुक केली असल्याचे दिसुन आले. सदर गुन्हयाचे तपासकामी राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्रीमती स्मार्तना पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -०२, श्री. आर. एन. राजे, सहा. पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, पुणे शहर, प्रताप मानकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी केलेल्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी श्रीमती अश्विनी सातपुते यांनी केलेल्या तपासामध्ये या गुन्हयातील आरोपी हे बिहार, आसाम, ओरीसा, कोलकता पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश इत्यादी राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
गुन्हयातील आरोपीतांचे खात्यावर सिरम कंपनीचे खात्यावरुन प्राप्त झालेल्या रकमा त्यांचे ओळखीचे इतर आरोपीना पाठविल्याचे दिसुन आले आहे. ज्या खात्यावर सिरम कंपनीचे पैसे वर्ग झाले ती बँक खाती तसेच सबंधीत बँकेतुन इतर आरोपीना पाठविण्यात आलेल्या सर्व बँक खात्याची माहिती प्राप्त करुन ती सर्व बँक खाती गोठविण्यात आली असुन आज पर्यंत एकुण १३,००,०००/- रुपये वेगवेगळया खात्यामध्ये गोठविले आहेत.
गुन्हयातील निष्पन्न आरोपींचे प्राप्त झालेले मोबाईल नंबरचे पोलीस अंमलदार सागर घोरपडे, मंगेश बोराडे व सायबर पोलीस स्टेशनचे प्रसाद पोतदार, अनिल पुंडलीक, शिरीष गावडे यांचे मदतीने तांत्रिक विश्लेषन व टॉवर लोकेशन प्राप्त करुन तपासी अधिकारी श्रीमती अश्विनी सातपुते, व स्टाफने १) राजीव कुमार शिवजी प्रसाद रा. परेमनटोला, पोस्ट कसदेवरा चंगरा, थाना- महाराजगंज, जि. सिवान, राज्य बिहार २) चंद्रभुषण आनंद सिंग रा. छापमठीया, थाना – निरंगज, तहसिल हाथिया, जिल्हा- गोपालगंज राज्य- बिहार, ३) कन्हैय्याकुमार संभु महंतो रा. ग्राम जिगरबा, थाना महाराजगंज, जिल्हा सिवान, राज्य बिहार, ४) रविंद्रकुमार हुबनाथ पटेल रा. ग्राम गहरपूर, पोष्ट – हाथीबाजार, तहसिल वाराणसी, जिल्हा वाराणसी, राज्य उत्तरप्रदेश, ५) राबी कौशलप्रसाद गुप्ता रा. ग्राम देवा, पोस्ट चिंगवाह, तहसिल कुसमी चिवालाह गोपादबनस मंजुली सिध्दी, मध्यप्रदेश, ६) यासीर नाझीम खान वय २७ वर्षे रा. गुळागुडीका नाका, एकतापुरी कॉलनी, ग्वाल्हेर मध्यप्रदेश राज्य, ७) प्रसाद सत्यनारायण लोवुडू रा. हाऊस नं. १, ७८/२, लाईन कोथुरु रेगुपालेम, पोस्ट येलामंचेली विशाखापट्टन्नमट आंध्रप्रदेश राज्य यांना दाखल गुन्हयामध्ये अटक करण्यात आली असून आरोपीना न्यायालयात हजर करुन त्यांची पोलीस कोठडी घेऊन तपास करण्यात आलेला आहे. गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी नामे प्रसाद लोवडू हा स्वॉफटवेअर इंजिनीयर असुन राबी गुप्ता हा विज्ञान शाखेचा पदवीधर असुन व्यवसायीक बँकेमध्ये नोकरी करीत असल्याचे दिसुन आलेले आहे. नमुद गुन्हा गुंतागुंतीचा असुन या गुन्हयात परराज्यातील एकुण ०७ आरोपी निष्पन्न करुन त्यांना अटक करुन त्यांचेकडे प्रत्यक्षात तपास केल्याची ही खुप दिवसांनी पहिली घटना आहे. आजुनही याबाबत सायबर तज्ञांचे मदतीने गुन्हयाचा तपास करण्यात येत आहे.