#SMART PHONE : हे आहेत 10,000 च्या रेंज मधील लेटेस्ट स्मार्ट फोन ! पाहा स्वस्त स्मार्टफोनची यादी

742 0

#SMART PHONE : युजरसाठी त्याचा स्मार्टफोन अनेक अर्थांनी खास आणि महत्त्वाचा असतो. केवळ कॉलिंगसाठीच नाही तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राहण्यासाठी आणि डिजिटल पेमेंटची सुविधा देण्यासाठी स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. मात्र, अनेकदा युजरचं बजेट इतकं कमी असतं की, त्याला नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचारच करता येत नाही.

जर तुम्हालाही तुमचा जुना स्मार्टफोन बदलायचा असेल आणि नव्या फोनसाठी मोठी रक्कम खर्च करावी लागेल असा विचार करत असाल तर ही बातमी तुमचा दिवस बनवू शकते. होय, सॅमसंग, रियलमी आणि रेडमी सारख्या ब्रँडचे फोन तुम्ही फक्त 10 हजार रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता. जाणून घेऊया, अशा किंमतीत कोणते स्मार्टफोन खरेदी करता येतील:

जर बजेट 10 हजार रुपयांच्या आसपास असेल तर तुम्ही रेडमीचे रेडमी 8 मॉडेल देखील तपासू शकता. रेडमी 8 ची किंमत 10,999 रुपये आहे. मात्र, ऑनलाइन शॉपिंगमध्ये बँक ऑफरमध्ये हा फोन आणखी काही सवलतीत खरेदी करता येणार आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.

विवोचा विवो वाय 16 स्मार्टफोन देखील तुम्ही कमी बजेटमध्ये चेक करू शकता. जर तुम्ही हा स्मार्टफोन ऑनलाइन खरेदी केला तर त्याची किंमत 10,499 रुपये आहे. विवोचा हा डिव्हाइस ३ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेजसोबत येतो.

जर तुम्ही कमी किंमतीत उत्तम स्मार्टफोन च्या शोधात असाल तर तुम्ही सॅमसंगचा सॅमसंग गॅलेक्सी एफ 04 देखील चेक करू शकता. हा स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरून ९,४९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. सॅमसंगचा हा फोन ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेजसोबत येतो.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!