…म्हणून शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ख्याती असलेल्या तुकाराम मुंढे यांची बदली

599 0

शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ख्याती असलेले प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंडे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. सध्या तुकाराम मुंढे यांची नियुक्ती आयुक्त कुटुंब कल्याण तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदावर होती. या पदावर कार्यरत असताना त्यांनी शिस्तीने कारभार करत असताना आरोग्य संस्थांना अचानक भेट देणे, मुख्यालय न राहणाऱ्यांना वेतन कपात आणि घर भाडे कपातीच्या नोटिसा देणे, 24 तास ड्युटी, इंटरशिप करणाऱ्यांनाही ड्युटी करावी लागेल अशी सक्ती केली होती.

यामुळेच डॉक्टर कर्मचाऱ्यांच्या संघटनांचा तुकाराम मुंढे यांना विरोध वाढू लागला होता. त्यानंतर आता आरोग्य अभियान आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले असून आदेशामध्ये लिहिले आहे की शासनाने आपली बदली केली असून आपण आपल्या आयुक्त कुटुंब कल्याण तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदाचा कार्यभार प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडे आणि आपल्याकडे अतिरिक्त स्वरूपात सोपवण्यात आलेल्या प्रकल्प संचालक महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी या पदाचा कार्यभार प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवून कार्यमुक्त व्हावे आणि पुढील आदेशाची प्रतीक्षा करावी असे म्हटले आहे.

ही बाब तुकाराम मुंडे यांच्या बाबत पहिल्यांदा घडत नाही आहे. आतापर्यंत त्यांच्या शिस्तप्रिय कामकाजामुळेच अनेक वेळा त्यांची बदली करण्यात आलेली आहे. आता पुन्हा एकदा याच त्यांच्या शिस्तीमुळे त्यांची उचलबांगडी करण्यात आली असल्याची चर्चा आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!