#Weather Forecast : पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; पुढचे 4 तास ‘या’ जिल्ह्यात खबरदारीचा इशारा

1029 0

पुणे : पुण्यात सकाळपासूनच वाटेवर ढगाळ होते. दुपारी पुण्यात आणि परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे नागरिकांची दाणादाण उडाली.

हवामानखात्याने दिलेल्या अंदाजानुसार रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, औरंगाबाद, नाशिक, जालना, हिंगोली, लातूर या जिल्ह्यांमध्ये येत्या तीन ते चार तासांत तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घराबाहेर पडताना खबरदारी घ्या असे आवाहन करण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!