महाराष्ट्र सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू : “आमदारांवर पक्ष विरोधी कारवाई व्हावी…!” कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादातील महत्त्वाचे मुद्दे

343 0

नवी दिल्ली : आज महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील ही एक मोठे घटना मानली जाते आहे. शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गट अशा या सत्ता संघर्षावर आज अखेर दोन्हीही पक्ष आपली बाजू मांडत आहेत. शिवसेनेचे वकील कपिल सिबल यांनी प्रखर युक्तिवाद केला आहे.

webcast.gov.in/scindia/

दरम्यान सुनावणीच्या प्रारंभी निवडणूक आयोगाच्या प्रक्रिये संबंधी निर्णय आणि धनुष्यबाण चिन्ह संबंधित दोन्हीही पक्षांनी बाजू मांडावी असं कोर्टाने म्हटलं तथापि आमदारांच्या अपात्रते संबंधी निर्णय घेतल्याशिवाय निवडणूक आयोगाचा निर्णय घेता येऊ शकणार नाही, असा युक्तिवाद शिवसेनेतर्फे करण्यात आला.

TOP NEWS MARATHI LIVE: शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची ?सत्तासंघर्षाची ‘सुप्रीम सुनावणी’ थेट सर्वोच्च न्यायालयातून LIVE

दरम्यान जेष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी महाराष्ट्राच्या या सत्ता संघर्षावरील वादाचा संपूर्ण घटनाक्रम सांगून काही महत्त्वाच्या घटनांवर प्रकाश टाकला.
-20 जून रोजी सर्व खलबत्ता सुरू झाली.
-21 जून रोजी आमदारांची बैठक बोलवण्यात आली होती. मात्र यामध्ये अनेक आमदार गैरहजर होते. ते गुवाहाटीमध्ये होते.
-बैठकीला आले नाही तर कारवाईला समोर जावं लागेल असं सांगूनही आमदार आले नाहीत. यासह महत्त्वाचा तिसरा दिवस होता , तो 29 जून ज्या दिवशी या शिवसेनेच्या आमदारांनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं.

अधिक वाचा : पुण्यानंतर आता महाराष्ट्रातील ‘या’ महत्त्वाच्या शहरांमधून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना अटक

हे तीन दिवस महत्त्वाचे असल्याचे कपिल सिबल यांनी म्हटलं. त्यानंतरही “29 जुलैला एकनाथ शिंदे स्वतः निवडणूक आयोगाकडे गेले. त्यांनी कोर्ट काय निकाल देते याची देखील वाट पाहिली नाही. तर सध्या ते स्वतः शिवसेना असल्याचं सांगत असून हे चुकीचं असल्याचं कपिल यांनी म्हटल आहे. शिंदे गटाने पक्ष सोडला नाही. तर त्यांनी व्हीपचे उल्लंघन का केलं ? शिवसेनेचे जे आमदार सदस्य वेगळे झाले. त्यांनी दुसऱ्या पक्षात जाऊन सरकार बनवायला पाहिजे होतं. ते आमदार जर इतर पक्षात गेले असते तर त्यांचं सदस्यत्व गेलं असतं. पण ते पक्षावर कब्जा करू शकत नाहीत”. असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.

अधिक वाचा : आज महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा दिवस ; शिंदे गटाच्या 16 आमदारांचे भवितव्य ठरणार

Share This News
error: Content is protected !!