HEALTH WEALTH : हिवाळ्यात बहुगुणी पपई खाल्ल्याने होतात अनेक फायदे, पचनासह हृदयकार्यही सुधारते

482 0

HEALTH WEALTH : थंडीत आपली प्रतिकारशक्ती अनेकदा कमकुवत होते. अशा वेळी आपल्या आहारात योग्य बदल करून स्वत:ला निरोगी ठेवणे गरजेचे आहे. पपई हे एक असे फळ आहे, जे हिवाळ्यात खाल्ल्याने अनेक फायदे मिळतात. थंड हवामानात याचे सेवन आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया हिवाळ्यात पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे…

१. हिवाळा जसजसा जवळ येतो तसतशी आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होत जाते. अशा वेळी आपण आपल्या आहारात अशा काही खाद्यपदार्थांचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे, ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते. अशावेळी पपईचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

२. असे अनेक लोक असतात ज्यांना हिवाळ्यात पचनाशी संबंधित समस्या येऊ लागतात. अशावेळी जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर पपई तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

३.जन कमी करायचं असेल तर त्यासाठी पपईचं ही सेवन करू शकता. व्हिटॅमिन सी, फोलेट आणि पोटॅशियमने समृद्ध असलेल्या पपईमध्ये केवळ 120 कॅलरीज असतात, जे निरोगी मार्गाने वजन कमी करण्यास उपयुक्त आहे.

४. व्हिटॅमिन ए समृद्ध पपई आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले कॅरोटीनोइड ल्युटीन डोळ्यांचे निळ्या प्रकाशापासून संरक्षण करते.

५. पपईमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात, अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतात. अशावेळी याच्या सेवनाने शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते, ज्यामुळे तुमचे हृदय निरोगी राहते.

( टीप : लेखात नमूद केलेले सल्ले आणि सूचना केवळ सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नये. )

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!