शिक्षकच होता हैवान; आई वडील एकमेकांच्या भांडणात होते व्यस्त; असा आला गुन्हा उघडकीस, पण तोपर्यंत…

909 0

पुणे : पुण्यामधील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अर्थात ही घटना उघडकीस येईपर्यंत या पिडीतेला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. पुण्यातील एका कराटे शिक्षकाला विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दहा वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यासह 17 हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे.

याप्रकरणी मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, 2018 मध्ये ही घटना घडली होती. ही पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना माहिती कळाली. याप्रकरणी आसिफ रफिक नदाफ वय वर्ष 31 याला दोषी ठरवण्यात आल आहे. या पिडीतेवर अत्याचार केल्यानंतर त्याने कुणाला सांगितलं तर आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकी या मुलीला दिली होती.

त्याचबरोबर तिच्या पालकांमध्ये सुरू असलेल्या भांडणामुळे या अत्याचाराबाबत या मुलीने कुणालाच माहिती दिली नाही. जेव्हा हा अत्याचार झाला तेव्हाही मुलगी अल्पवयीन होती. असेही न्यायालयाने नमूद केलं आणि पॉक्सो कायद्या अंतर्गत या नराधमाला शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!