राज्य सरकारने हरी नरकेवर गुन्हा दाखल करावा; अंजुम इनामदार, वाचा सविस्तर प्रकरण

495 7

पुणे : डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची मिसाईल मॅन म्हणून ओळख संपूर्ण जगात आहे. ज्या व्यक्तीचा आदर संपूर्ण जग करतो ज्यांनी भारत देशासाठी मोठा योगदान दिला. संपूर्ण जगात आपल्या देशाची दहशत निर्माण केली. अशा महान व्यक्तीबद्दल चुकीचे विधान करणे हे गैर कृत्य आहे. याबाबत हरी नरके यांनी समस्त भारतीयांची माफी मागितली पाहिजे व राज्य सरकारने गुन्हा दाखल करावा. अशी मागणी आम्ही मूलनिवासी मुस्लिम मंचाच्या वतीने करीत आहोत.

एखाद्या व्यक्तीचा जरी वाचनाची लिहिण्याची संबंध नसेल किंवा आयुष्यात एपीजे अब्दुल कलाम यांनी कोणतीही पुस्तक वाचली किंवा लिहिली नसेल. तरी भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी या देशासाठी केलेल्या कार्याचा व देशासाठी दिलेल्या योगदानाचा दखल घेणे गरजेचे आहे. ज्या व्यक्तीचा आदर संपूर्ण जग करतो त्याचा आदर करणे हेच आपली भारतीय संस्कृती आहे. जरी ते एका शंकर आचार्याच्या पायाजवळ बसून आपली नम्रता आपली भारतीय संस्कृती त्यांनी दाखवली असेल तर यात काही गैर नाही.

प्राध्यापक हरी नरके यांनी एपीजे अब्दुल कलाम यांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरांचा निमंत्रण दिला होता तो आले नाही त्या कार्यक्रमाला तर इतका मनामध्ये राग ठेवणे चुकीचा आहे. तो राग मनामध्ये ठेवूनच त्यांनी आज त्यांच्या फेसबुक पेजवर एपीजे अब्दुल कलाम यांचा अपमान केला आहे. हे अपमान कलाम यांच्या नसून तर भारतीयांचा आहे असे आम्ही मानतो.

मिसाईल मॅन भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची हरी नरके यांनी केलेली बदनामी. त्वरित राज्य सरकारने गुन्हा दाखल करावा अशी मागणी ही आम्ही करीत आहोत.

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!