संगमनेरमध्ये महिला ओढतात हनुमानाचा रथ, काय आहे त्या मागील कारण ?

2621 0

हनुमान आणि महिला हे विसंगत असणारं समीकरण आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात ब्रह्मचारी असणाऱ्या मारुती देवाचा रथ ओढण्याचा मान महिलांना दिला जातो. काय आहे या मागचे कारण जाणून घेऊ या.

संगमनेरमधे एक अनोखी प्रथा आहे. इथे महिला हनुमानाचा रथ ओढतात. सण उत्सवाला इंग्रजांनी बंदी घातली होती. 1929मध्ये ब्रिटीश सरकारने संगमनेरमधील हनुमान जयंतीचा रथ काढण्यास पुरूषांना मज्जाव केला होता. त्यावेळी झुंबराबाई औसक या महिलेने इतर महिलांना एकत्र करून रथ ओढण्याचा निर्णय घेतला. आणि रथाची मिरवणूक गावभर काढली. त्या घटनेची आठवण म्हणून आजही संगमनेरमध्ये हनुमान जयंतीचा रथ येथील महिला ओढतात.

या रथयात्रेदरम्यान पोलिसांना विशेष मान असून पोलिसांनी वाजत गाजत आणलेला झेंडा रथावर लावल्यावरच रथ ओढला जात असतो. सर्व जातीधर्माच्या महिला हा रथ ओढतात.

Share This News
error: Content is protected !!