ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा न्यायालयाकडून जामीन मंजूर

507 0

सातारा – खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी सातारा जिल्हा न्यायालयाने ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना आज जामीन मंजूर केला.

या प्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्‍यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्‍यात आली हाेती. यानंतर सदावर्ते यांच्या वकिलांनी जामीन अर्ज केला. यावर पुन्हा युक्तिवाद झाला. मात्र, जामीन अर्जावर निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला. मंगळवारीही याबाबत निर्णय झाला नाही. आज न्यायालयाने सदावर्ते यांना सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.

Share This News
error: Content is protected !!