#PUNE : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मोठे स्पष्टीकरण

658 0

पुणे : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मोठे स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री म्हणाले कि, ” कसबा आणि चिंचवड ची नावे आज संध्याकाळ पर्यंत जाहीर होतील अशी अपेक्षा आहे.

अजूनही नाव कोणाचे ही नाव निश्चित झालेले नसून, आज उशिरा रात्री नावे फायनल होईल. ६ तारखेला अर्ज भरण्यासाठी वेळ ठरली आहे सकाळी ११ वाजता कसबा आणि १ वाजता चिंचवड त्यानुसार, ६ तारखेला हे सगळे हजर असतील.

पक्षाची जबाबदारी आणि निवडणुका वेगळ्या गोष्टी आहेत. संघटनामतमक जबाबदारी दिली म्हणून तो निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडले असे होत नाही. माधुरी मिसाळ यांनी सर्व पक्षांना विनंती पत्र दिले आहेत जेणे करून ही निवडणूक बिनविरोध होईल. राज्यस्तरीय नेत्यांशी आमचे लोकं बोलत असून, ५० टक्के वाटतं की निवडणूक बिनविरोध होईल

विश्वास घात कोणी केला, २०१९ मध्ये तुम्ही गद्दारीच केली ना ?
नाना पटले यांना देखील चंद्रकांत पाटील यांनी प्रतिउत्तर दिले आहे. ते म्हणाले कि, घर फोडण्याची परंपरा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आहे . सत्तेचा दुरुपयोग आणि विश्वास घात कोणी केला, २०१९ मध्ये तुम्ही गद्दारीच केली ना ? पाठीत कोणी खंजीर खुपसली याच्यावर एक वेगळी परिषद घ्यायला हवी

नाशिक पदवीधर निवडणूक निकालावर भाष्य करताना ते म्हणाले कि, सत्यजित तांबे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत पुढे काय करायचे ते त्यांनी ठरवायला हवे .

Share This News
error: Content is protected !!