ग्रामपंचायत निवडणूक निकाल २०२२ : “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळालेलं यश कौतुकास पात्र आहे…!” विजयी महाराष्ट्र सैनिकांची राज ठाकरेंनी थोपटली पाठ

658 0

मुंबई : आज महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली होती. या लढाईमध्ये भाजप ,राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या धुराळामध्ये मनसेने देखील चांगली कामगिरी केली आहे. स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विजयी झालेल्या महाराष्ट्र सैनिकांची पाठ थोपटली आहे.

राज ठाकरे यांनी ट्विट करून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, “महाराष्ट्रात आज अनेक ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळालेलं यश कौतुकास पात्र आहे. सर्व लढलेल्या आणि विजयी झालेल्या महाराष्ट्र सैनिकांचं मी मनापासून अभिनंदन करतो.

Share This News
error: Content is protected !!