खुशखबर! पुणे मुंबई प्रवास फक्त अडीच तासात

267 0

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राला लवकरच वंदे भारत ही ट्रेन मिळणार आहे. त्यामुळे आता मुंबई-पुणे प्रवास फक्त अडीच तासात पुर्ण होणार आहे.

महाराष्ट्राला लवकरच ‘वंदे भारत ही ट्रेन मिळणार आहे. त्यामुळे हा प्रवास अधिक सुृखकर होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 15 ऑगस्टपर्यंत या ट्रेनच्या फेऱ्या सुरु होणार असून मुंबई – पुणे प्रवास करणाऱ्यासाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.

मुंबई – पुणे प्रवास करण्यासाठी सर्वात कमी वेळेत धावणारी डेक्कन एक्सप्रेस ही पहिली ट्रेन होती. ही ट्रेन साधारण 3 ते 4 तासात पोहचायची. दरम्यान आता मात्र महाराष्ट्राला पहिली ‘वंदे भारत ट्रेन’ मिळणार आहे. या ट्रेन मार्फत मुंबई – पुणे प्रवास आता केवळ अडीच तासात पुर्ण होणार आहे. ही ट्रेन एसी आणि सीटींग असणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा अर्धा तास वाचणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!