पुण्यातील कोंढवा परिसरातील लुल्लानगर येथे शनिवारी एक धक्कादायक घटना घडली.
मित्राने एकाची गर्लफ्रेंड पटवल्याने त्याचा राग मनात धरुन तरुणावर तिघांनी कोयता व चाकूने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी नदीम अहमद सय्यद (वय २७, रा. चुडामण तालीम, भवानी पेठ) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी इरफान इम्तीयाज खान (वय २५), मोसीम सलीम शेख (वय २४, रा. मनीष पार्क, कौसरबाग, कोंढवा व आणखी एकावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गोळीबार मैदान चौक ते लुल्लानगर चौक दरम्यान शनिवारी पहाटे साडेतीन वाजता घडला.