JOB : तरुणांसाठी आनंदाची बातमी… दरमहा भरणार रोजगार मेळावा !

384 0

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने प्रत्येक महिन्याला रोजगार मोहीम अर्थात ‘प्लेसमेंट ड्राइव्ह’ चे आयोजन करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून नोकरीसाठी इच्छुक युवक युवतींना नामवंत खासगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमूहांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्या अंतर्गत पहिला प्लेसमेंट ड्राइव्ह येत्या 11 जानेवारीला होणार आहे. ही मोहीम कशी असेल पाहूयात

प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात येणार आहे. नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींना उमेदवारांच्या मुलाखतीसाठी पाचारण करण्यात येईल. पात्र उमेदवारांना जागेवरच नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी विभागाच्या www. rojgar. mahaswayam. gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणं आवश्यक आहे. युजर आयडी आणि पासवर्डच्या आधारे लॉगिन गरजेच आहे. लॉगिननंतर डॅशबोर्डवरील ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर’ या बटनावर क्लिक करून प्रथम पुणे विभाग आणि नंतर पुणे जिल्हा निवडून त्यातील फर्स्ट प्लेसमेंट ड्राइव्ह – पुणे या रोजगार मेळाव्याची निवड करावी, असं आवाहन विभागाकडून करण्यात आलं आहे.

आता युवक-युवतींना रोजगार मेळाव्याची वाट पहावी लागणार नाही तर प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी प्लेसमेंट ड्राइव्हच आयोजन करण्यात येणार आहे. ऑनलाइन नोंदणी केलेल्या उमेदवारांनी बुधवारी 11 जानेवारी रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात आपल्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहावं असं आवाहन विभागातर्फे करण्यात आलं आहे.

Share This News
error: Content is protected !!