पुणेकरांसाठी चांगली बातमी : भुयारी मेट्रोची ट्रायल रन यशस्वी; 85 टक्के काम पूर्ण !

382 0

पुणे : सध्या कर्वे रोडवरील मेट्रो मार्ग सुरू आहे. अर्थात हा मार्ग सुरू असला तरी एकंदरीत अंतर पाहता वाहतुकीच्या दृष्टीने त्याचा फारसा उपयोग होत नाहीये. शहरातील मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. नुकतीच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली. दरम्यान मंगळवारी सायंकाळी पुणे मेट्रोच्या भुयारी मेट्रोचे ट्रायल रन घेण्यात आले. पुणे मेट्रोच्या वतीने या ट्रायल रनचा व्हिडिओ शेअर करून ही ट्रायल यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले आहे.

स्वारगेट ते शिवाजीनगर असा हा भुयारी मार्ग आहे. या भुयारी मार्गाचे कामकाज 85% पूर्ण झाले आहे. जमिनीपासून 28 ते 30 मीटर खोल हा भुयारी मार्ग आहे. उर्वरित काम देखील प्रगतीपथावर असून ते देखील लवकरच पूर्ण होईल. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट असा एकूण 17 पूर्णांक 4 km चा हा मेट्रो मार्ग असून त्यापैकी स्वारगेट ते शिवाजीनगर असा हा भुयारी मार्ग बनवून तयार झाला आहे.

Share This News
error: Content is protected !!