PHOTO OF THE DAY : देव तेथेचि जाणावा ! बाप्पाच्या आगमनाच्या पावन दिवशी नितेश राणेंनी पोस्ट केलेल्या आजींच्या फोटोची चर्चा…

718 0

आज घरोघरी थाटामाटात बुद्धीच्या देवतेचं आगमन होते आहे . बाप्पा घरामध्ये विराजमान झाले कि संपूर्ण घरात जसे नवचैतन्य निर्माण होते तसेच संपूर्ण महाराष्ट्रात होते आहे . प्रत्येक जण आपल्यापरीने श्रीगणेशाचे स्वागत करत आहेत. एकीकडे लोभस अश्या सुंदर गणेश मूर्तीचे कौतुक होत असतानाच , नितेश राणे यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केलेल्या या फोटोचे देखील अनेक युझर कौतुक करता आहेत .

परमेश्वराचे नाव घेणे हे सुद्धा आपला हिंदू धर्म मोठे पुण्य मानतो , अशातच श्रीमंत – गरीब , श्री पुरुष असा कोणताही भेद न मनात प्रत्येक देहात परमात्म्याचा वास असतो . स्वच्छ अंतःकरणाने केलेली कोणतीही मदत देखील पुण्याचं असते . हा फोटो नक्की कोणत्या कलाकाराने क्लिक केला हे माहिती नाही परंतु आमदार नितेश राणे यांनी हा फोटो शेअर केल्या नंतर अधिक प्रकाश झोतात आला आहे .

एक आजीबाई एका लहानश्या स्टूल वरती बसल्या आहेत . मागे श्री गणेश मूर्ती आहे . फोटो अगदी अशा अँगलने घेण्यात आला आहे कि , त्या आजीबाईंमध्ये श्रीगणेशाचे रूप दिसावे . फोटोग्राफरची कल्पकता सुंदर आहे . माणसात देव शोधावा . तर दुसरीकडे काही नकारात्मक कॉमेंट्स देखील काही युझर्स करत आहेत .

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!