पिंपरी-चिंचवड : वायनरी, दारूवरील टॅक्स कमी करण्यासाठी आग्रही असणारे महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री आणि पवार साहेबाना वेदांताबाबत मात्र बैठक घ्यायला वेळ मिळाला नाही. वेदांता प्रकल्प आमच्या काळात नाही गेला तर महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरनामुळं गेला, असं म्हणत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
ग्रामविकास अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ गाव जलसमृद्ध गाव’ कार्यशाळेचं उदघाटन करण्याससाठी ते पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. अमित शाह यांना आवाहन देणारे उद्धव ठाकरे आत्याबाईला मिशा असत्या तर… या म्हणीप्रमाणं वागतायत. आपल्या कार्यकाळात त्यांनी काहीही भरीव कामं केलं नाही.
आता मात्र ते शेवटची धडपड करतायत. दसरा मेळाव्यालाही त्यांनी दुसरं मैदान बघावं, असा सल्लाही महाजन यांनी दिलाय. दरम्यान जलयुक्त शिवार योजनेत कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही उलट आम्हाला क्लीनचीट मिळाली आणि या योजनेचा गावांना फायदा झाल्याचंही महाजन म्हणाले.