ACC आणि अंबुजा सिमेंट कंपन्या गौतम अदानी यांनी केल्या टेकओव्हर

419 0

नाव दिल्ली- देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी आता देशाचे नवे सिमेंट किंग होणार आहेत. त्यांच्या अदानी समुहाने देशातील दोन सर्वात मोठ्या सिमेंट कंपन्या एसीसी लिमिटेड आणि अंबुजा सिमेंट्स खरेदी केल्या आहेत. त्यामुळे आता सिमेंट व्यवसायातही अदानी ग्रुपचे नाव झळकणार आहे.

गेल्या 17 वर्षांपासून भारतात स्विस सिमेंट कंपनी Holcim ग्रुपच्या कंपन्या व्यवसाय करत आहेत. कंपनीचे भारतात तीन मोठे ब्रँड आहेत, ज्यात अंबुजा सिमेंट, एसीसी लिमिटेड आणि मायसेम यांचा समावेश आहे. यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये करार झाला असून यासोबतच अदानी समूह आता सिमेंट व्यवसायातही उतरणार आहे.

Holcim आणि त्याच्या सब्सिडियरी कंपन्यांचा अंबुजा सिमेंटमध्ये 63.19 टक्के आणि ACC मध्ये 54.53 टक्के हिस्सा आहे. ACC सिमेंटमधील 54.53 टक्के स्टेकपैकी, 50.05 टक्के स्टेक अंबुजा सिमेंट मार्फत विकत घेतला होता. अदानी समूहाने दोन्ही कंपन्यांमधील होल्सीमच्या स्टेकसाठी 10.5 बिलियन डॉलरचा (सुमारे 81,360 कोटी रुपये) करार केला आहे.

अंबुजा सिमेंटचे देशात 6 सिमेंट प्लांट आहेत. तर 8 सिमेंट ग्राइंडिंग युनिट आहेत. एकट्या अंबुजा सिमेंटची वार्षिक उत्पादन क्षमता 31 दशलक्ष टन आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide