Crime

पिंपरी चिंचवड मधील पर्यटकांवर दापोलीत हल्ला ;कोयत्याने केले वार

405 0

दापोली- हर्णै समुद्र किनाऱ्यावर गाडी उभी करण्याच्या वादावरून पिंपरी चिंचवड मधील दोन तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या हल्ल्यातून दोन्ही तरुण थोडक्यात बचावले. ही धक्कादायक घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी संशयित हॉटेल सुरलीच्या भारत मुळ्ये व अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम परदेशी (वय २९), सूरज काळे (वय २५) अशी हल्ला झालेल्या जखमी तरुणांची नाव आहे. हे दोन्ही तरुण पिंपरी चिंचवड येथील राहणारे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोली जवळील हर्णै समुद्र किनाऱ्याच्या रस्त्यावर ही घटना रविवारी सायंकाळी घडली. पिंपरी चिंचवड येथील पाच पर्यटक हर्णै समुद्र किनाऱ्यावरील समुद्र संकेत या हॉटेलमध्ये थांबले होते. आज ते पुण्याकडे जायला निघाले असताना सुराली गार्डन जवळ एक ईनोव्हा गाडी रस्त्यावर लावण्यात आल्याने गाडी बाजूला करण्यास सांगितले. याचा राग राग मनात धरून पाठलाग करत टोळक्याने या दोघांवर कोयत्याने हल्ला चढवला. त्यांच्या हातावर कोयत्याने वार करण्यात आला. या हल्ल्यात दोघे जखमी झाले. तसेच त्यांच्या इनोव्हा गाडीची काचही फोडण्यात आली. दापोली पोलीस तपास करत आहेत.

Share This News

Related Post

मैत्री फाऊंडेशन व राजस सोसायटीच्या रक्तदान शिबिरात 52 जणांचे रक्तदान

Posted by - June 13, 2022 0
पुणे- शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मैत्री फाऊंडेशन, पुणे व राजस सोसायटी, कात्रज यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात…
Viral chat

भावा मित्र नाही पैसा कमव! हॅकरने तरुणाला दिला महत्वाचा सल्ला

Posted by - June 7, 2023 0
शहरात सध्या आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सायबर भामट्यांकडून पार्ट टाईम जॉब देण्याच्या नावाखाली व्हिडीओ लाईक करण्याचे…
Ratnagiri News

Ratnagiri News : हृदयद्रावक ! दोन सख्ख्या भावांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - September 11, 2023 0
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri News) देवरुख येथील सप्तलिंगी नदीत दोन सख्खे भाऊ बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये (Ratnagiri…
Majhi Kanya Bhagyashree Yojana

Majhi Kanya Bhagyashree Yojana : लेक जन्माला येताच ‘या’ योजनेद्वारे होणार लखपती

Posted by - December 15, 2023 0
मुंबई : केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून मुलींसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजनांतर्गत मुलींच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंतचा खर्च…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *