गणेश जयंती विशेष : दगडूशेठ गणपती मंदिरात गणेश जन्म सोहळ्यानिमित्त आकर्षक आरास व भाविकांची गर्दी

453 0

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थीला  मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने आज  पहाटे ४ ते सकाळी ६ यावेळेत पद्मश्री उस्मान खान यांनी  सतारवादनातून श्रीं चरणी स्वराभिषेक अर्पण केला. त्यापूर्वी पहाटे ३ वाजता मंदिरात ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक देखील झाला.

मंदिरावर तिरंगी फुलांची आकर्षक सजावट व विद्युतरोषणाई करण्यात आली आहे . मंदिर पहाटे ३ पासून दर्शनासाठी खुले करण्यात आले असल्याने भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.