चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महामृत्युंजय मंत्राचे सामूहिक पठण

503 0

पुणे- भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी महामृत्युंजय मंत्राचे सामूहिक पठण करण्यात आले. महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा १० जूनला वाढदिवस असल्याने शहरातील विविध भागात भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पाटील यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुसाठी आणि राजकीय कारकीर्दीसाठी माजी सभागृह नेते बिडकर यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.

सोमवार पेठेतील श्री नागेश्वर मंदिरात महामृत्युंजय मंत्राच्या सामूहिक पठणाचा कार्यक्रम झाला. यावेळी गणेश बिडकर हे सपत्नीक सहभागी झाले होते.
मंत्रोच्चाराच्या स्वरांनी मंदिरातील वातावरण चैतन्यमय झाले होते. या कार्यक्रमाला सोमवार पेठेतील नागरिकांनी हजेरी लावली होती. तेजस सप्तर्षी गुरुजी आणि त्यांच्या २७ सहकाऱ्यांनी हे पठण केले.

यावेळी सागर अफूवाले, उद्धव मराठे, मंदार पवार, सुजित पुजारी, राहुल शर्मा, माऊली शिवले, सोमनाथ शेळके, सुमीत रांबाडे, प्रताप सावंत, दिलीप मामा बहिरट, निलेश अल्हाट, बाला शेख, सुनील बारणे, सुरेखा शिंदे, कल्पना बहिरट, किरण गोसावी, शिल्पा शेळके, बाळासाहेब घोडके, लक्ष्मी घोडके, वैशाली सोनवणे, अनुराधा तळेगावकर यांच्यासह पक्षाचे स्थानिक पदाधिकारी इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!