बसमध्ये झाली मैत्री; पुस्तक खरेदीच्या बाहण्याने पोहोचले पुण्यात; आरोपीने कोल्ड्रिंक मधून गुंगीचे औषध पाजून अत्याचार केला, तरुणीची 16 लाखाची फसवणूक

653 0

पुणे : पुण्यात रोजच अत्याचार, बलात्कार फसवणुकीच्या घटना उघडकीस येत आहेत. पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर तरुण-तरुणी शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने येत असतात. सांगलीतील तरुणी बरोबर असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

सांगलीतून बसने पुण्याकडे येत असताना तिची एका फहीम नवीन सय्यद याच्याशी ओळख झाली. या तरुणाने गोड बोलून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर पुण्याला पुस्तक खरेदीच्या बाहाण्याने आले असता पुस्तक खरेदी केल्यानंतर तिला जेवणासाठी म्हणून हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे कोल्ड्रिंक मधून तिला गुंगीचे औषध पाजले.

यानंतर बालगंधर्व चौकातील विजय लॉजमध्ये तिला घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने या आरोपीला तब्बल 16 लाख 86 हजार रुपये दिले असल्याचं समजतंय. त्यानंतर देखील या आरोपीने पैशांची मागणी थांबवली नाही. त्यामुळे अखेर या पिडीतेने पोलिसांमध्ये धाव घेतली.

पोलिसांनी तात्काळ फहीम सय्यद याला अटक केली असून त्याची कोणतीही ट्रॅव्हल्स एजन्सी नसून तो केवळ एका एजन्सीमध्ये चालक म्हणून काम करत होता. पोलिसांनी या भामट्याला बेड्या ठोकल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!