#KOLHAPUR : वृद्धाश्रमात मन मोकळं केलं; एकमेकांना साथ देण्याचं वचन दिलं !वयाच्या सत्तरीत अडकले विवाह बंधनात

1100 0

कोल्हापूर : कोल्हापुरातील घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमातील दोघा वृद्धांनी वयाच्या सत्तरीमध्ये लग्न गाठ बांधली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार अनुसया शिंदे वय वर्ष 70 आणि बाबुराव पाटील वय वर्ष 75 हे दोघे वृद्धाश्रमातच भेटले. रक्ताच्या नात्यांनी साथ सोडल्यानंतर या दोघांनी एकमेकांकडे मन मोकळं केलं. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि त्यानंतर आता लग्नापर्यंत पोहोचले आहे.

मानसिक दृष्ट्या खचलेल्या या दोघांनीही एकमेकांना आधार देण्याचा निर्णय घेतला आणि वृद्धाश्रमातच मांडव घालून ग्रामस्थ आणि प्रमुख लोकांच्या उपस्थितीत या दोघांचेही थाटामाटात लग्न पार पडले आहे. या लग्नामध्ये दोघांनीही एकमेकांची जात, धर्म आणि कुंडली याचा विचार न करता केवळ उर्वरित आयुष्य सुखात आणि एकमेकांना मायेचा आधार देऊन व्यतित करण्यासाठीच लग्न बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.

Share This News
error: Content is protected !!