माजी गृहमंत्री अनिल देशमुख जेलबाहेर; ‘टायगर इज बॅक’ चे झळकले फलक आणि स्वागतासाठी विरोधी पक्षनेते अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती VIDEO

427 0

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज अखेर जामीनावर सुटका झाली आहे. आर्थर रोड तुरुंगातूनअनिल देशमुख तब्बल 13 महिने 26 दिवसानंतर बाहेर आले आहेत. 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी जेलबाहेर उपस्थित होते. यावेळी अनिल देशमुख यांच्या समर्थनार्थ ‘टायगर इज बॅक’, ‘ हौसला बुलंद रहे’चे फलक देखील झळकले आहेत.

देशमुख यांचा जामीन रद्द करण्याची सीबीआयने याचिका दाखल केली होती. हि याचिका काल मंगळवारी हाय कोर्टाने फेटाळल्यानंतर आज बुधवारी अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर आले. 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. आज सव्वा वर्ष म्हणजे 13 महिने 26 दिवसांच्या कोठडीनंतर ते बाहेर आले आहेत.

Share This News
error: Content is protected !!