शिर्डीला सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; प्रवासादरम्यान नेवाश्यात जेवणासाठी थांबले होते विद्यार्थी !

902 0

शिर्डी : अमरावतीतून शिर्डीला सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती समोर येते आहे. अमरावतीतील विद्यार्थी हे शिर्डीला सहलीसाठी आले होते. दरम्यान सर्व विद्यार्थी नेवासा येथे थांबले असता, रात्रीच्या जेवणातून या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असल्याचे समजते आहे. अमरावतीतून एकूण 230 विद्यार्थी सहलीसाठी आले होते. यांपैकी 88 विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळीचा त्रास होऊ लागला, त्यानंतर या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

खास नववधूंसाठी ! लग्न तोंडावर आले पण चेहऱ्यावर येणारे पिंपल्स थांबेनात ? हे उपाय करून पहा

सुदैवान या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान नक्की जेवणातूनच विषबाधा झाली आहे का ? हे अद्याप समजू शकले नाही, कारण काही विद्यार्थ्यांनी येथील विहिरीचं पाणी प्यायला होतं. तर काहींनी येथील बोरं आणि चिंचा देखील खाल्ल्या होत्या असे समजते.

Share This News
error: Content is protected !!