बेकायदा बाईक-टॅक्सी चालवणाऱ्या रॅपिडो कंपनी विरोधात भोसरीत पहिला गुन्हा दाखल VIDEO

352 0

पिंपरी-चिंचवड : बाईक टॅक्सी चालवणाऱ्या रॅपिडो कंपनी विरोधात पिंपरी चिंचवड मध्ये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेकायदा बाईक टॅक्सी आणि रॅपिडो कंपनी विरोधात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील अनेक रिक्षा संघटना आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान भोसरी पोलीस स्टेशनमध्ये रॅपिडो कंपनी विरोधात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. कुठलाही परवाना नसताना मागील एक वर्षापासून बाईक टॅक्सीद्वारे बेकायदेशीररित्या प्रवासी वाहतूक करत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलाय.

Share This News
error: Content is protected !!