खुर्चीवर बसण्यावरून झाला वाद आणि संतापलेल्या तरुणाने थेट गोळीच झाडली

286 0

एका फायनान्शियल कंपनीच्या ऑफिसमध्ये खुर्चीवर बसण्यावरून दोन कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. त्यातून संतापलेल्या कर्मचाऱ्याने थेट बंदुकीतून गोळ्या झाडल्या. यामध्ये सहकारी कर्माचारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा प्रकार हरयाणाच्या गुरुग्राममध्ये घडला. जखमी कर्मचाऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातं.

आरोपीच नाव अमन जांगडा असं असून जखमी तरुणाचे नाव विशाल (वय 23) असून तो ग्रुरुग्राम सेक्टर 9 मधील फिरोज गांधी कॉलनीमध्ये राहतो.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल आणि आरोपी अमन जांगडा यांच्यात मंगळवारी खुर्चीवर बसण्यावरून वाद झाला होता. दोघांनीही एकमेकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. त्यानंतर बुधवारी पुन्हा या दोघांमध्ये खुर्चीवर बसण्यावरून वाद झाला होता. संध्याकाळी दोघेही ऑफिस सुटल्यावर बाहेर पडले. रस्त्यावरून जात असताना अमन याने आपल्याजवळील पिस्तुलातून विशालच्या दिशेने गोळी झाडली. गोळ्या झाडल्यांतर अमन घटनास्थळावरून फरार झाला. जखमी विशाल याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं. पोलीस फरार आरोपी अमनचा शोध घेत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!