Breaking News

Breaking News -भटिंडा येथील लष्करी तळावर गोळीबार.. 4 जणांचा मृत्यू

457 0

भटिंडा येथील लष्करी तळावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झालाय. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर संपूर्ण परिसराची नाकेबंदी करून सर्च ऑपरेशन सुरू आहे. ऑफिसर्स मेसमध्ये ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत मारले गेलेले सैनिक होते की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ऑफिसर्स मेसमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या गोळीबार थांबला असून या घटनेत मारले गेलेले सैनिक होते की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तळावर लष्कराचे अधिकारी पोहचले आहेत. त्यांनी चौकशी सुरु केली आहे. भंटिडा लष्करी तळावरुन एक रायफल व काही काडतूसे दोन दिवसांपूर्वी गायब झाली होती अशीही माहिती समोर आली आहे.

भटिंडा मिलिटरी स्टेशन हे एक जुनं आणि खूप मोठं मिलिटरी स्टेशन आहे. पूर्वी ते शहरापासून थोडं लांब होतं, परंतु शहराच्या विस्तारामुळं आता मिलिटरी स्टेशन रहिवासी भागाच्या जवळ आलं आहे. यामुळे कोणीही या लष्करी तळापर्यंत सहज पोहचू शकतो. या लष्करी तळाच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणावर आहे. २४ तास लष्करी जवानांचा पहार असतो.

Share This News
error: Content is protected !!