मुंब्रामधील एम.जे कंपाऊंडमध्ये अग्नितांडव, आगीत 4 ते 5 गोदामे जळून खाक

245 0

ठाणे- मुंब्रामधील एम.जे कंपाऊंड मधील भीषण आगीमध्ये गोदामे जळून खाक झाली आहेत. ही घटना आज पहाटे ४ वाजता घडली. या गोदामांमध्ये प्लास्टिकचे भंगाराचे सामान होते. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही मात्र भंगाराच्या गोदामांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.

एम. जे. कंपाऊंड येथील एकूण १७ प्लॅस्टिक भंगार वस्तू असलेल्या पत्र्याच्या गाळ्यांना आग लागली होती. या आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. दिल्लीमधील कालची आगीची घटना ताजी असतानाच मुंब्रामध्ये आगीची घटना घडली आहे.

घटनेची माहिती मिळताच शीळ डायघर पोलीस अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी जे.सी.बी. मशीनसह तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. २ फायर वाहन, २ रेस्क्यू वाहन, २ वॉटर टँकर, १ जम्बो वॉटर टँकर, तसेच नवी मुंबईचे कोपरखैरणे अग्निशमन दलाचे १ फायर वाहन, १ जम्बो वॉटर टँकर यांच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

Share This News
error: Content is protected !!