#PUNE : अखेर राज्यसरकारचा MPSC च्या विद्यार्थ्यांना दिलासा ; MPSC चा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार !

398 0

पुणे : एमपीएसी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यभरातील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत मांडला. त्यानंतर इतरही मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना हे नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली होती. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे.

Share This News
error: Content is protected !!