Breaking News

मोठी बातमी : अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; संप समन्वय समितीची राज्य सरकार सोबत झाली ‘हि’ चर्चा, वाचा सविस्तर

523 0

मुंबई : अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्याची घोषणा संप समन्वय समितीने केली आहे. राज्य सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समन्वय समितीने दिली आहे.

राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी गेल्या सात दिवसांपासून संप पुकारला होता. आता तो मागे घेत असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. संपकऱ्यांची प्रमुख मागणी असलेली जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं संप समन्वय समितीकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आजपासून हा संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!