DASARA MELAVA

अखेर शिवाजी पार्कवर दसरा मेळावा शिवसेनेचाच !

340 0

मुंबई : अखेर निर्णय झालाच ! आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा होणार यासाठी सुनावणी होणार होती. ही सुनावणी पार पडली आहे. आणि यावर्षी देखील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा शिवसेनेचाच होणार असा निर्णय कोर्टाने जाहीर केला.

शिवसेनेकडून वकील एसपी चीनोय आणि मुंबई महापालिकेकडून वकील मिलिंद साठे यांनी काम पाहिले. तर शिंदे गटाच्या वकिलांना देखील यावेळी जोरदार युक्तिवाद केलाय. चार तासाच्या युक्तिवादानंतर अखेर कोर्टाने शिवसेनेलाच परवानगी दिली आहे. यावेळी “खरी शिवसेना कोणती यात आम्हाला पडायचं नाही.” असं देखील प्रकर्षानं उच्च न्यायालयाने म्हटले आहे. तर दोन्ही गटांचे अर्ज नाकारण्याचा पालिकेचा निर्णय देखील योग्य होता असे देखील कोर्टाने म्हटले.

दरम्यान आम्ही कोरोना काळात शिवाजी पार्क मैदान मेळाव्यासाठी मागितलं नाही. दसरा मेळावा हा शिवसेनेचा इतिहास आहे. त्यामुळे मूळ शिवसेना कोणाची हा मुद्दा इथे नाही. दरवर्षी शिवाजी पार्क शिवसेनेचा दसरा मेळावा होतो त्यामुळे आम्हालाच परवानगी मिळायला हवी उद्या कोणतीही व्यक्ती येऊन परवानगी मागील तर ते योग्य नाही ! असा युक्तिवाद यावेळी वकील एस पी चिनॉय केला आहे.

शिंदे गटाची याचिका फेटाळून लावण्यात यावी अशी मागणी करत शिवाजी पार्क मैदानासाठी सर्वात आधी अर्ज शिवसेनेनेच केला होता तर शिंदे गटाने 30 ऑगस्ट रोजी अर्ज केला आहे. त्यामुळे शिवसेनेलाच परवानगी मिळावी असा युक्तिवाद केला. यावर उच्च न्यायालयाने अखेर शिवसेनेच्या बाजूने निकाल दिला आहे.

Share This News
error: Content is protected !!