‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ; भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी

296 0

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संस्थेवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केलेल्या कारवाईविरोधात काल संध्याकाळी (शुक‘वार, २३ सप्टेंबर २०२२) पुणे शहर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान काही समाजकंटकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या.

तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी ६० ते ७० जणांचा बेकायदेशीर जमाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनधिकृतपणे जमा झाला होता. या सर्वांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली आहे.

मुळीक म्हणाले, ‘कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणे आणि देशाच्या विविध भागांत अंतर्गत जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडविण्याच्या या जमावाचा उद्देश असल्याचे स्पष्ट होते.’

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणार्‍या सर्व कार्यकर्त्यांवर तातडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी पुणे शहर भाजपच्या वतीने करीत आहोत.

Share This News
error: Content is protected !!