exam

NEET 2023: सांगलीत विद्यार्थिनींशी गैरवर्तन; कपडे उलटे घालून द्यायला लावली परीक्षा

531 0

सांगली : सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. सांगली येथे झालेल्या नीट परीक्षेदरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये परीक्षा केंद्रामध्ये आलेल्या विद्यार्थिनींना त्यांचे अंगावरील कपडे आणि अंतर वस्त्र उलटे परिधान करायला लावून परीक्षा द्यायला लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संतापजनक प्रकाराबाबत जागृत पालकांनी घडलेल्या प्रकाराची तक्रार नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
देशभरात रविवारी 7 मे रोजी नीट परीक्षा पार पडली. यादरम्यान सांगली येथील परीक्षा केंद्रावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सांगली शहरातील एका महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनींना परीक्षेला बसण्यासाठी चक्क त्यांचे कपडे आणि अंतरवस्त्र उलटे परिधान करायला लावून परीक्षा देण्यास सांगितले होते.

Meghna Bordikar : आमदार मेघना बोर्डीकर यांना ‘भारत गौरव पुरस्कार’ जाहीर

यानंतर विद्यार्थिनींना आणि सोबत असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील आपले कपडे त्या ठिकाणी असणाऱ्या खोल्यांमध्ये बदलून ते उलटे घालून परीक्षा द्यावी लागली होती. यानंतर परीक्षा संपल्यानंतर बाहेर आलेल्या विद्यार्थिनींच्या अंगावरील उलटे कपडे पाहून पालकांना याबाबत प्रश्न पडला होता. याबाबत विचारणा केली असता सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्यासोबत हा सर्व प्रकार घडल्याचे विद्यार्थिनींनी आपल्या पालकांना सांगितले. यानंतर पालकांनी घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!