PUNE CRIME : अतिक्रमण विरोधी तक्रार दिल्याच्या रागातून पत्रकारासह कुटुंबीयांना मारहाण; पत्रकार संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

415 0

पुणे : पुण्यातील मुंडवा येथे एका रहिवासी इमारतीच्या प्रवेशद्वारा भोवती अतिक्रमण करण्यात आल्याची तक्रार या इमारतीचे रहिवासी फिर्यादी पत्रकार आणि इमारतीतील काही रहिवाशांनी केली होती. दरम्यान शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास अमित रुके यांच्या वडिलांना या आरोपींनी अतिक्रमण विरोधी तक्रार दिल्याच्या रागातून मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी भांडण थांबवण्यासाठी त्यांच्या आई आणि ते स्वतः मध्ये पडले असता त्यांच्यावर देखील लोखंडी रोडने डोक्यात आणि पाठीवर मारहाण केल्याचे समजते. त्यासह तीस हजार रुपयांचा मोबाईल देखील हिसकावून घेण्यात आला. त्यांच्या आईंना अश्लील भाषेत शिवीगाळ देखील करण्यात आली.

याप्रकरणी मुंडवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. याप्रकरणी सुरेंद्र पिल्ले वय वर्षे ६५, विशाल पिल्ले वय वर्षे ४० , आशिष पिल्ले वय वर्षे ३५, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर विशाल पिल्ले याला पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास मुंढवा पोलीस करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!