#MNS : रवींद्र खेडेकर यांच्यासह सहा जणांची मनसेतून हकालपट्टी; कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचारात सहभागी झाल्याने कारवाई

848 0

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गटनेते साईनाथ बाबर यांनी दिलेल्या पत्रकानुसार रवींद्र खेडेकर, सागर पांगारे ,गोपी घोरपडे, अनिल बांदांगे ,रिजवान मिरजकर प्रकाश ढमढेरे आणि निलेश प्रकाश निकम यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये हे सात जण सहभागी झाले असल्याकारणाने पक्षविरोधी काम करणाऱ्या या सर्वांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असून, गेले काही वर्षापासून ते पक्षात कार्यरत नाही असे देखील या पत्रकामध्ये म्हटलं आहे.

Share This News
error: Content is protected !!