“संसदेतला माईक बंद केला तरी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची भावना दाबता येणार नाही; छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताना संसदेत अमोल कोल्हेंबाबत घडले असे…

409 0

नवी दिल्ली : महाराष्ट्रमध्ये सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अपमान कारक वक्तव्यामुळे वादंग पेटलेला असतानाच खासदार अमोल कोल्हे यांच्याबाबत संसदेत घडलेल्या या प्रकाराचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रमध्ये छत्रपती शिवरायांबद्दल जे काही अवमानकारक वक्तव्य केली जात आहे, त्याबाबत संसदेत बोलत असताना त्यांना पूर्ण बोलू न देता माईक बंद करण्यात आला. आणि संसदेच्या अध्यक्षांनी ‘हो गया’ असे म्हटले. यावर अमोल कोल्हे यांनी ‘हो गया नाही, अध्यक्ष महोदय बोलणे का मोका दिजीये… असे म्हणत संसदेत आपली भूमिका पूर्ण मंडली. या घटनेचा व्हिडिओ त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून शेअर करून घडल्या प्रकाराबाबत रोष व्यक्त केला आहे.

Share This News
error: Content is protected !!